Thursday, January 14, 2021

गुरू गोबींद सिंग जयंती (बुधवार २०जनवरी २०२१)

 

गुरु गोबिन्द सिंह जी का जन्म:पौष शुक्ल सप्तमी संवत् 1723 विक्रमी तदनुसार 22 दिसम्बर 1666- मृत्यु 7 अक्टूबर 1708 sikho के 10 वे गुरू थे। उनके पिता गुरू तेज बहादुर की मृत्यु के उपरान्त ११ नवम्बर सन १६७५ को वे गुरू बने। वह एक महान योद्धा, कवि, भक्त एवं आध्यात्मिक नेता थे। सन १६९९ में बै सखी के दिन उन्होने खल्सा  पन्थ की स्थापना की जो सिखों के इतिहास का सबसे महत्वपूर्ण दिन माना जाता है। 


गुरु गोबिन्द सिंह 


जन्म:                 पौष शुक्ल सप्तमी संवत् 1723 विक्रमी                             तदनुसार 22 दिसम्बर1666पाटणा,बिहार

                         हिंदुस्तान


मृत्यु                   7 अक्टूबर 1708, 

                         नांदेड, महाराष्ट्र

                         हिंदुस्तान



पदवी                 सिखों के १० वे गुरु, 

                        सिख खालसा सेना के संस्थापक एवं पहले                          सेनापति


पूर्वाधिकारी        गुरु तेग बहादुर


उत्तराधिकारी      गुरु ग्रंथ साहिब


जीवनसथी         माता जीतो, माता सुंदरी, माता साहिब देवा


माता पिता          गुरु तेग बहादुर, माता गूजरी


बच्चे                  अजित सिंग, जुझार सिंह, जोरावर सिंह                              फतेह सिंह 


गुरू गोबिन्द सिंह ने सिखों की पवित्र ग्रन्थ गुरु ग्रंथ साहिब को पूरा किया तथा उन्हें गुुुरर रूप में सुशोभित किया। विचित्र नाटक को उनकी आत्मकथा माना जाता है। यही उनके जीवन के विषय में जानकारी का सबसे महत्वपूर्ण स्रोत है। यह दासम ग्रंथ का एक भाग है। दसम ग्रन्थ, गुरू गोबिन्द सिंह की कृतियों के संकलन का नाम है।

उन्होने मुगलों या उनके सहयोगियों (जैसे, शिवालिक पहाडियों के राजा) के साथ १४ युद्ध लड़े। धर्म के लिए समस्त परिवार का बलिदान उन्होंने किया, जिसके लिए उन्हें 'सरबंसदानी' (सर्ववंशदानी) भी कहा जाता है। इसके अतिरिक्त जनसाधारण में वे कलगीधर, दशमेश, बाजांवाले आदि कई नाम, उपनाम व उपाधियों से भी जाने जाते हैं।

गुरु गोविंद सिंह जहां विश्व की बलिदानी परम्परा में अद्वितीय थे, वहीं वे स्वयं एक महान लेखक, मौलिक चिंतक तथा संस्कृत सहित कई भाषाओं के ज्ञाता भी थे। उन्होंने स्वयं कई ग्रंथों की रचना की। वे विद्वानों के संरक्षक थे। उनके दरबार में ५२ कवियों तथा लेखकों की उपस्थिति रहती थी, इसीलिए उन्हें 'संत सिपाही' भी कहा जाता था। वे भक्ति तथा शक्ति के अद्वितीय संगम थे।

उन्होंने सदा प्रेम, एकता, भाईचारे का संदेश दिया। किसी ने गुरुजी का अहित करने की कोशिश भी की तो उन्होंने अपनी सहनशीलता, मधुरता, सौम्यता से उसे परास्त कर दिया। गुरुजी की मान्यता थी कि मनुष्य को किसी को डराना भी नहीं चाहिए और न किसी से डरना चाहिए। वे अपनी वाणी में उपदेश देते हैं भै काहू को देत नहि, नहि भय मानत आन। वे बाल्यकाल से ही सरल, सहज, भक्ति-भाव वाले कर्मयोगी थे। उनकी वाणी में मधुरता, सादगी, सौजन्यता एवं वैराग्य की भावना कूट-कूटकर भरी थी। उनके जीवन का प्रथम दर्शन ही था कि धर्म का मार्ग सत्य का मार्ग है और सत्य की सदैव विजय होती है।



 



Friday, September 18, 2020

एक अनोखी...... प्रेम कहाणी


 

कहाणी,  एक आशा प्रेमाची जी कधीच व्यक्त करता आली नाही. 

     एक निसर्गाच्या सनिध्यतील नयनरम्य गाव. त्यातील दीपक आणि ज्योती लहानणापासूनच त्यांची खूप चांगली  मैत्री होती अगदी स्वतः पेक्षा जास्त एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लहानपणाच्या मैत्रिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. दोघेही आता कॉलेजात होती एकाच कॉलेजात एकाच वर्गात. कॉलेजला एकत्र जाणे एकत्र जेवण एकत्र अभ्यास करणे यामुळे दिपकला ज्योती आणखीनच आकर्षित करू लागली इतकी की आता, दिपक ज्योती शिवाय जगू शकत नाही असे दीपकला जाणवत होते. त्यात भर म्हणून वर्गातील मित्र दिपकला ज्योती च्या नावाने चीढवत होते.

पण दिपकचे प्रेम ज्योतीला कळत नव्हते, त्याला समजत नव्हतं की आपलं प्रेम तिला कसे सांगावे




     दीपक एक गरीब घरातील गुणवंत मुलगा होता. ते दोन भाऊ आणि एक बहिण आणि वडील आसे त्याचे कुटूंब होते भाऊ आणि वडील दोघे कामाला जात दीपक कॉलेजला आणि बहिण घरी कारण बहिण ही डोळ यांनी अपंग. डॉक्टर प्रयत्न करीत होते की कोण नेत्रदान केले तर तिचे डोळे ठीक होतील,ती पुन्हा जग पाहू शकेल पण कोणी मिळतच नव्हते.

सगळे आप आपल्या परीने प्रयत्न करीत होते. भाऊ आणि वडील काट कसरीने घर चकवून पेसे जमा करीत होते तिच्या ऑपरेशन साठी.

    इकडे दीपक प्रयत्न करीत होता ज्योतीला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची पण ज्योतीला ते कळतच नव्हते.ज्योती ची इतर मुलासोबत वाढती मैत्री पाहून त्याला वाटू लागले की,ती त्याला पसंत करीत नसावी म्हणून ती त्याच कडे लक्ष देत नसावी.

इ कडे ज्योती कॉलेजमध्ये गुंग झाली तिला कळ लेच नाही की दीपक गेली दोन महिने कॉलेजला आलाच नाही,म्हणून ती त्याच्या घरी गेली आणि तिला आश्चर्य चा धक्काच बसला.

दीपक डोळयाला पट्टी बांधून बसला होता आणि त्याची बहिण जेवण बनवीत होती. तिला कळतच नव्हते की नेमके काय घडले होते. तिने त्याच्या बहिणीला विचारले तेंव्हा तिला कळले की दिपकने आपले दोन्ही डोळे तिला दिले होते. ती रडत घरी निघून गेली........



Monday, April 6, 2020

अर्धवट प्रयोग....

    




            ' जय ' एक गरीब पण होतकरू मुलगा. काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा बाळगणारा आपल्याच विचारात नेहमी गुंग राहणारा, पण मन मिळाऊ आसे व्यक्तिमत्व.
इतर विषय पेक्षा त्याचे विज्ञान विषयावर खूप प्रेम तो खूप दिवसापासून एक विषय घेऊन काहीतरी बनविण्याच्या तयरित होता, पण त्यात त्याला काहीतरी अडचण येत होती. तो रोज नवी नवी पुस्तकमधून काहीतरी शोधायचा पण त्याला जे हवे होते ते मिळत नवते. त्यामुळे त्याचे मन कशाताच लागत नवते.तो वेडा होईल की काय असे वाटत होते. पण एके दिवशी त्याच्या चेऱ्यावरचा आनंद फारच वेगळा होता, काहीतरी हस्तगत केल्यचा आनंद होता तो.





                 ज्याप्रमाणे एखादे झाड आपले अन्न आपणच बनविते त्या प्रमाणे मानसणे देखील सूर्य प्राकशापासून
आपले अन्न आपणच बनवावे हा त्याच्या प्रयोगाचा विषय.
आणि आज तो त्यात यशस्वी झाला असे त्याला वाटत होते.
पण आता मानव आपले अन्न आपणच तयार करू शकतो हे सिध्द करण्यासाठी त्याला एक माणसाची गरज होती, ज्याच्यावर तो हा प्रयोग करू शकेल.
          तो त्या माणसाच्या शोधत आता फिरत होता. खूप प्रयत्नांनंतर त्याला एक माणूस मिळाला
गरीब, उपाशीपोटी जीवनाशी झुंज खेळणारा, धाडशी,
पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायला तयार होणारा.
     जयचा शोध व प्रयोग सिद्ध होण्यासाठी आता थोडाच वेळ राहिला होता.
"आता जगात कोणीच उपाशी झोपणार नाही " म्हणून विजय
खूप खुश होता,त्या आनंदाच्या भरात तो त्याची गाडी प्रयोगशाळेच्या दिशेने आतिश य वेगाने घेऊन जात होता.
आणि त्याचा ताबा त्या गाडीवरून सुटला आणि गाडीचा आपघात झाला,
                     आणि विजय होता होता राहिला.

Tuesday, October 8, 2019

Just One Chance

आयुष्यात सर्वांना हवी असते एक……………………....संधी




आज मी पण त्याच्या इतका यशस्वी असतो, पण मला एकही संधी मिळाली नाही.
हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल पण खरच आस होत का हो की आपणास कधीच कोणतीच संधी मिळाली नाही…..
की आपणास ती संधी कळलीच नाही??????

एकदा एका चित्रकाराने आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. त्यात सुंदर सुंदर कलाकृती सादर केल्या होत्या, एक व्यक्ती त्यातील दोन विचित्र चित्र पाहून दंग झाला त्याने खूप वेळ त्या चित्रांचा विचार केला पण त्याला काहीच कळेना, मग त्याने त्या चित्रकारास जवळ बोलावून विचारले की है दोन चित्रं मला समजले नाहीत,एका चित्रामध्ये चेहरा समोरून पूर्ण पाने केसांनी झाकलेला व पायावर पंख होते, तर दुसऱ्या चित्रामध्ये त्याचे डोके पाठीमागून टाकले होते.
       

 त्यावर त्या चित्रकाराने त्याला दिलेले उत्तर अप्रतिम होते.











हे चित्र आहे “संधी” चे
मग याच्या चेहऱ्यावर केस का???
कारण संधी जेंव्हा येते तेंव्हा आपण तिला ओळखू शकत नाही.
पायांवर पंख??
कारण ती लगेच उडून जाते, तिचा उपयोग नाही झाला की ती लगेच उडून जाते.
मग त्या व्यक्तीने विचारले की हे दुसरे चित्र कश्याचे, यात याचे डोके पाठीमागून टाकले??
ही पण संधीच आहे जर आपण तिला समोरूनच केसांना पकडून ठेवले तरच ती आपली असते, नाहीतर आपण तिला पकडायला उशीर केला तर पाठीमागिल टाकले हाताला लागेल व ती संधी हातातून निघून जाईल.
आपल्या कर्तव्यापासून पलायन करण्याचे हे एक कारण आहे की, मला कोणतीच संधी मिळाली नाही.आयुश्यात आपणास एवढया संधी मिळतात पण आपण त्याना ओळखू शकत नाही.कोणतीतरी संधी आपण समोरून पकडू असा आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वास असेल तर आपल्याला संधी नक्कीच मिळते.

Thursday, October 3, 2019

नवरात्र "श्री क्षेत्र तुळजापूर"


                    "श्री क्षेत्र  तुळजापूर"        
साडेतीन शक्तीपीठातील एक पूर्ण पीठ

 

                महारास्ट्रतील एकूण साडेतीन शक्तीपिठे आहेत , त्यात  तुळजापूर, कोल्हापूर, माहुर, हे पूर्ण शक्तीपिठे आहेत. वणीचे शक्तीपीठ हे अर्ध पीठ मानले जाते.

        यातील तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे ,हे धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण. या तुळजापूर शहराची ऐतीहासिक माहिती कदाचित सर्वांना माहिती नसेल,ती तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

तसे माझे गाव तुळजापूर पासून २० किमी आंतरवर आहे पण, तालुक्याचे ठिकाण आसल्याने नेहमीचेच जाने येणे. नवरात्र चालू आसल्याने तुम्हाला या देवस्थानाबद्दल थोडीशी माहीत द्यावीशी वाटली म्हणून हा लेख.
        श्री तुळजापूर हे आई तुळजाभवानी मातेचे वास्तव्याचे ठिकाण आसून हे एक संपूर्ण शक्तीपीठ आहे.तुळजापूर हे समुद्रासपाटीपासून २७० फुट उंच आहे.हे गाव मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले घराण्याचे कुल दैवत आहे. मातेचे दर्शन घेतल्याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच मोहिमेवर कधीच गेले नाहीत.
        पूर्वी या शहराचे नाव होते “चिंचपूर” कारण शहराच्या व मंदिराच्या परिसरात चिंचच्या झाडाचे प्रमाण खूप जास्त होते. म्हणून या शहराला चिंचपूर आसे ही म्हणतात.

राजेशहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार
        श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदीरामध्ये जाण्यासाठी दोन मोठे महाद्वार आहेत. त्यातील पहिले द्वार म्हणजे राजेशहाजी महाद्वार” होय, दुसरे राजमाता जिजाऊ हे होय.
        या दोन्ही महाद्वाराना राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी नावे दिली आहेत. राजेशहाजी महाद्वारातून प्रवेश करून खाली जाण्यासाठी सुंदर घडीव आशा दगडी पायर्‍या आसून, या पायर्‍यांचे तीन टप्पे आहेत.


कल्लोळ तीर्थ....

   मुख्य प्रवेश द्वाराच्या पायर्‍या उतरून थोडे पुढे आल्यावर हे कल्लोळ तीर्थ हे डाव्या हाताला लागते. देवी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन आगोदर प्रतेक भाविक या कल्लोळ तीर्था मध्ये स्नान करून पवित्र होतात व नंतर देवी मातेच्या दर्शनासाठी निघतात.

        या तीर्थची अशी आख्यायिका  आहे की, मातेच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली आहेत.



गोमुख तीर्थ....
        मुख्य प्रवेश द्वाराच्या पायर्‍या उतरून थोडे पुढे आल्यावर गोमुख  तीर्थ हे उजव्या हाताला लागते. या तीर्थात ६ फुट उंचीवरून गोमुखातून म्हणजे या जागेवर बांधीव जागेत एक गोमुख आहे त्याच गोमुखतून सतत जलधारा सांडत आसते.
        या गोमुखची आशी मान्यता आहे की याच्या जलधारामध्ये कधीच खंड पडत नाही. ही जलधारा मंदिराच्या वरच्या बाजूस एक तळे आहे, त्याचे नाव 'महंकावती' आसे आहे.
        हा प्रवाह साक्षात श्री गंगा मातेचा प्रवाह आहे अशी  येथील लोकांची श्रदधा  आहे.