Thursday, October 3, 2019

नवरात्र "श्री क्षेत्र तुळजापूर"


                    "श्री क्षेत्र  तुळजापूर"        
साडेतीन शक्तीपीठातील एक पूर्ण पीठ

 

                महारास्ट्रतील एकूण साडेतीन शक्तीपिठे आहेत , त्यात  तुळजापूर, कोल्हापूर, माहुर, हे पूर्ण शक्तीपिठे आहेत. वणीचे शक्तीपीठ हे अर्ध पीठ मानले जाते.

        यातील तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे ,हे धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण. या तुळजापूर शहराची ऐतीहासिक माहिती कदाचित सर्वांना माहिती नसेल,ती तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

तसे माझे गाव तुळजापूर पासून २० किमी आंतरवर आहे पण, तालुक्याचे ठिकाण आसल्याने नेहमीचेच जाने येणे. नवरात्र चालू आसल्याने तुम्हाला या देवस्थानाबद्दल थोडीशी माहीत द्यावीशी वाटली म्हणून हा लेख.
        श्री तुळजापूर हे आई तुळजाभवानी मातेचे वास्तव्याचे ठिकाण आसून हे एक संपूर्ण शक्तीपीठ आहे.तुळजापूर हे समुद्रासपाटीपासून २७० फुट उंच आहे.हे गाव मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले घराण्याचे कुल दैवत आहे. मातेचे दर्शन घेतल्याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच मोहिमेवर कधीच गेले नाहीत.
        पूर्वी या शहराचे नाव होते “चिंचपूर” कारण शहराच्या व मंदिराच्या परिसरात चिंचच्या झाडाचे प्रमाण खूप जास्त होते. म्हणून या शहराला चिंचपूर आसे ही म्हणतात.

राजेशहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार
        श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदीरामध्ये जाण्यासाठी दोन मोठे महाद्वार आहेत. त्यातील पहिले द्वार म्हणजे राजेशहाजी महाद्वार” होय, दुसरे राजमाता जिजाऊ हे होय.
        या दोन्ही महाद्वाराना राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी नावे दिली आहेत. राजेशहाजी महाद्वारातून प्रवेश करून खाली जाण्यासाठी सुंदर घडीव आशा दगडी पायर्‍या आसून, या पायर्‍यांचे तीन टप्पे आहेत.


कल्लोळ तीर्थ....

   मुख्य प्रवेश द्वाराच्या पायर्‍या उतरून थोडे पुढे आल्यावर हे कल्लोळ तीर्थ हे डाव्या हाताला लागते. देवी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन आगोदर प्रतेक भाविक या कल्लोळ तीर्था मध्ये स्नान करून पवित्र होतात व नंतर देवी मातेच्या दर्शनासाठी निघतात.

        या तीर्थची अशी आख्यायिका  आहे की, मातेच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली आहेत.



गोमुख तीर्थ....
        मुख्य प्रवेश द्वाराच्या पायर्‍या उतरून थोडे पुढे आल्यावर गोमुख  तीर्थ हे उजव्या हाताला लागते. या तीर्थात ६ फुट उंचीवरून गोमुखातून म्हणजे या जागेवर बांधीव जागेत एक गोमुख आहे त्याच गोमुखतून सतत जलधारा सांडत आसते.
        या गोमुखची आशी मान्यता आहे की याच्या जलधारामध्ये कधीच खंड पडत नाही. ही जलधारा मंदिराच्या वरच्या बाजूस एक तळे आहे, त्याचे नाव 'महंकावती' आसे आहे.
        हा प्रवाह साक्षात श्री गंगा मातेचा प्रवाह आहे अशी  येथील लोकांची श्रदधा  आहे.

       


     

 



8 comments: