कहाणी, एक आशा प्रेमाची जी कधीच व्यक्त करता आली नाही.
एक निसर्गाच्या सनिध्यतील नयनरम्य गाव. त्यातील दीपक आणि ज्योती लहानणापासूनच त्यांची खूप चांगली मैत्री होती अगदी स्वतः पेक्षा जास्त एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लहानपणाच्या मैत्रिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. दोघेही आता कॉलेजात होती एकाच कॉलेजात एकाच वर्गात. कॉलेजला एकत्र जाणे एकत्र जेवण एकत्र अभ्यास करणे यामुळे दिपकला ज्योती आणखीनच आकर्षित करू लागली इतकी की आता, दिपक ज्योती शिवाय जगू शकत नाही असे दीपकला जाणवत होते. त्यात भर म्हणून वर्गातील मित्र दिपकला ज्योती च्या नावाने चीढवत होते.
पण दिपकचे प्रेम ज्योतीला कळत नव्हते, त्याला समजत नव्हतं की आपलं प्रेम तिला कसे सांगावे
दीपक एक गरीब घरातील गुणवंत मुलगा होता. ते दोन भाऊ आणि एक बहिण आणि वडील आसे त्याचे कुटूंब होते भाऊ आणि वडील दोघे कामाला जात दीपक कॉलेजला आणि बहिण घरी कारण बहिण ही डोळ यांनी अपंग. डॉक्टर प्रयत्न करीत होते की कोण नेत्रदान केले तर तिचे डोळे ठीक होतील,ती पुन्हा जग पाहू शकेल पण कोणी मिळतच नव्हते.
सगळे आप आपल्या परीने प्रयत्न करीत होते. भाऊ आणि वडील काट कसरीने घर चकवून पेसे जमा करीत होते तिच्या ऑपरेशन साठी.
इकडे दीपक प्रयत्न करीत होता ज्योतीला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची पण ज्योतीला ते कळतच नव्हते.ज्योती ची इतर मुलासोबत वाढती मैत्री पाहून त्याला वाटू लागले की,ती त्याला पसंत करीत नसावी म्हणून ती त्याच कडे लक्ष देत नसावी.
इ कडे ज्योती कॉलेजमध्ये गुंग झाली तिला कळ लेच नाही की दीपक गेली दोन महिने कॉलेजला आलाच नाही,म्हणून ती त्याच्या घरी गेली आणि तिला आश्चर्य चा धक्काच बसला.
दीपक डोळयाला पट्टी बांधून बसला होता आणि त्याची बहिण जेवण बनवीत होती. तिला कळतच नव्हते की नेमके काय घडले होते. तिने त्याच्या बहिणीला विचारले तेंव्हा तिला कळले की दिपकने आपले दोन्ही डोळे तिला दिले होते. ती रडत घरी निघून गेली........
No comments:
Post a Comment