Friday, September 18, 2020

एक अनोखी...... प्रेम कहाणी


 

कहाणी,  एक आशा प्रेमाची जी कधीच व्यक्त करता आली नाही. 

     एक निसर्गाच्या सनिध्यतील नयनरम्य गाव. त्यातील दीपक आणि ज्योती लहानणापासूनच त्यांची खूप चांगली  मैत्री होती अगदी स्वतः पेक्षा जास्त एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लहानपणाच्या मैत्रिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. दोघेही आता कॉलेजात होती एकाच कॉलेजात एकाच वर्गात. कॉलेजला एकत्र जाणे एकत्र जेवण एकत्र अभ्यास करणे यामुळे दिपकला ज्योती आणखीनच आकर्षित करू लागली इतकी की आता, दिपक ज्योती शिवाय जगू शकत नाही असे दीपकला जाणवत होते. त्यात भर म्हणून वर्गातील मित्र दिपकला ज्योती च्या नावाने चीढवत होते.

पण दिपकचे प्रेम ज्योतीला कळत नव्हते, त्याला समजत नव्हतं की आपलं प्रेम तिला कसे सांगावे




     दीपक एक गरीब घरातील गुणवंत मुलगा होता. ते दोन भाऊ आणि एक बहिण आणि वडील आसे त्याचे कुटूंब होते भाऊ आणि वडील दोघे कामाला जात दीपक कॉलेजला आणि बहिण घरी कारण बहिण ही डोळ यांनी अपंग. डॉक्टर प्रयत्न करीत होते की कोण नेत्रदान केले तर तिचे डोळे ठीक होतील,ती पुन्हा जग पाहू शकेल पण कोणी मिळतच नव्हते.

सगळे आप आपल्या परीने प्रयत्न करीत होते. भाऊ आणि वडील काट कसरीने घर चकवून पेसे जमा करीत होते तिच्या ऑपरेशन साठी.

    इकडे दीपक प्रयत्न करीत होता ज्योतीला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची पण ज्योतीला ते कळतच नव्हते.ज्योती ची इतर मुलासोबत वाढती मैत्री पाहून त्याला वाटू लागले की,ती त्याला पसंत करीत नसावी म्हणून ती त्याच कडे लक्ष देत नसावी.

इ कडे ज्योती कॉलेजमध्ये गुंग झाली तिला कळ लेच नाही की दीपक गेली दोन महिने कॉलेजला आलाच नाही,म्हणून ती त्याच्या घरी गेली आणि तिला आश्चर्य चा धक्काच बसला.

दीपक डोळयाला पट्टी बांधून बसला होता आणि त्याची बहिण जेवण बनवीत होती. तिला कळतच नव्हते की नेमके काय घडले होते. तिने त्याच्या बहिणीला विचारले तेंव्हा तिला कळले की दिपकने आपले दोन्ही डोळे तिला दिले होते. ती रडत घरी निघून गेली........



Monday, April 6, 2020

अर्धवट प्रयोग....

    




            ' जय ' एक गरीब पण होतकरू मुलगा. काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा बाळगणारा आपल्याच विचारात नेहमी गुंग राहणारा, पण मन मिळाऊ आसे व्यक्तिमत्व.
इतर विषय पेक्षा त्याचे विज्ञान विषयावर खूप प्रेम तो खूप दिवसापासून एक विषय घेऊन काहीतरी बनविण्याच्या तयरित होता, पण त्यात त्याला काहीतरी अडचण येत होती. तो रोज नवी नवी पुस्तकमधून काहीतरी शोधायचा पण त्याला जे हवे होते ते मिळत नवते. त्यामुळे त्याचे मन कशाताच लागत नवते.तो वेडा होईल की काय असे वाटत होते. पण एके दिवशी त्याच्या चेऱ्यावरचा आनंद फारच वेगळा होता, काहीतरी हस्तगत केल्यचा आनंद होता तो.





                 ज्याप्रमाणे एखादे झाड आपले अन्न आपणच बनविते त्या प्रमाणे मानसणे देखील सूर्य प्राकशापासून
आपले अन्न आपणच बनवावे हा त्याच्या प्रयोगाचा विषय.
आणि आज तो त्यात यशस्वी झाला असे त्याला वाटत होते.
पण आता मानव आपले अन्न आपणच तयार करू शकतो हे सिध्द करण्यासाठी त्याला एक माणसाची गरज होती, ज्याच्यावर तो हा प्रयोग करू शकेल.
          तो त्या माणसाच्या शोधत आता फिरत होता. खूप प्रयत्नांनंतर त्याला एक माणूस मिळाला
गरीब, उपाशीपोटी जीवनाशी झुंज खेळणारा, धाडशी,
पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायला तयार होणारा.
     जयचा शोध व प्रयोग सिद्ध होण्यासाठी आता थोडाच वेळ राहिला होता.
"आता जगात कोणीच उपाशी झोपणार नाही " म्हणून विजय
खूप खुश होता,त्या आनंदाच्या भरात तो त्याची गाडी प्रयोगशाळेच्या दिशेने आतिश य वेगाने घेऊन जात होता.
आणि त्याचा ताबा त्या गाडीवरून सुटला आणि गाडीचा आपघात झाला,
                     आणि विजय होता होता राहिला.