Monday, April 6, 2020

अर्धवट प्रयोग....

    




            ' जय ' एक गरीब पण होतकरू मुलगा. काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा बाळगणारा आपल्याच विचारात नेहमी गुंग राहणारा, पण मन मिळाऊ आसे व्यक्तिमत्व.
इतर विषय पेक्षा त्याचे विज्ञान विषयावर खूप प्रेम तो खूप दिवसापासून एक विषय घेऊन काहीतरी बनविण्याच्या तयरित होता, पण त्यात त्याला काहीतरी अडचण येत होती. तो रोज नवी नवी पुस्तकमधून काहीतरी शोधायचा पण त्याला जे हवे होते ते मिळत नवते. त्यामुळे त्याचे मन कशाताच लागत नवते.तो वेडा होईल की काय असे वाटत होते. पण एके दिवशी त्याच्या चेऱ्यावरचा आनंद फारच वेगळा होता, काहीतरी हस्तगत केल्यचा आनंद होता तो.





                 ज्याप्रमाणे एखादे झाड आपले अन्न आपणच बनविते त्या प्रमाणे मानसणे देखील सूर्य प्राकशापासून
आपले अन्न आपणच बनवावे हा त्याच्या प्रयोगाचा विषय.
आणि आज तो त्यात यशस्वी झाला असे त्याला वाटत होते.
पण आता मानव आपले अन्न आपणच तयार करू शकतो हे सिध्द करण्यासाठी त्याला एक माणसाची गरज होती, ज्याच्यावर तो हा प्रयोग करू शकेल.
          तो त्या माणसाच्या शोधत आता फिरत होता. खूप प्रयत्नांनंतर त्याला एक माणूस मिळाला
गरीब, उपाशीपोटी जीवनाशी झुंज खेळणारा, धाडशी,
पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायला तयार होणारा.
     जयचा शोध व प्रयोग सिद्ध होण्यासाठी आता थोडाच वेळ राहिला होता.
"आता जगात कोणीच उपाशी झोपणार नाही " म्हणून विजय
खूप खुश होता,त्या आनंदाच्या भरात तो त्याची गाडी प्रयोगशाळेच्या दिशेने आतिश य वेगाने घेऊन जात होता.
आणि त्याचा ताबा त्या गाडीवरून सुटला आणि गाडीचा आपघात झाला,
                     आणि विजय होता होता राहिला.